Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

42 लाखांच्या एम.डी. ड्रग्स सह दोघांना अटक.

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष- १२ ची धडाकेबाज कारवाई..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 मुंबई , 5 मार्च – मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष- १२ च्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत मुंबईतल्या गोरेगाव पुर्वच्या संतोष नगर येथील बी.एम.सी. कॉलनी परिसरातून ‘मेफेड्रॉन’ या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ लाख
किंमतीचे २८५ ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालया हजर केले असता त्यांना ७ मार्च २०२४ रोजी पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोरेगाव पुर्वच्या संतोष नगर येथील बी.एम.सी. कॉलनी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास सार्वजनिक शौचालया जवळ, मुंबई गुन्हे शाखा, कक्ष- १२ च्या पथकाला मोहम्मद हनिफ रफिक खान, वय ४८ आणि एक महिला संशयीतरित्या आढळुन आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात केला. यावेळी कक्ष-१२ च्या पथकाने सतर्कता दाखऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्या दोघांच्या ताब्यात रूपये ४२,७५,०००/-, किंमतीचा २८५ ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ, त्याच बरोबर १ लाख ११,५००/- रूपायांची रोख रक्कम, तसेच डिजीटल वजन काटा इत्यादी मुद्देमाल सापडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात कलम ८ (क), २२ (क), २९ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघां आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे सापडलेला ड्रग्स चा साठा त्यांनी कोठुन आणला आणि ते कोणास विक्री करणारे होते याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांना न्यायला समोर हजर केले असता त्यांना दि. ०७/०३/२०२४ रोजी पर्यत पोलीस कोठडी दिली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास कक्ष १२ करीत आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष- १२चे प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि सावंत, स.पो.नि रासकर, पो.ह लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शैलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरूले, म.पो.ह. क्र. कदम, म.पो.शि खाडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेपेची शिक्षाही रद्द..!

 

Comments are closed.