Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार; मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतला आढावा

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 15 मे –आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. २५ जुन ते ०५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २७ जुन रोजी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने बस सेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.