62 रुग्ण होणार दारूच्या व्यसनातून मुक्त
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 23 मे –जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी सुरू असलेल्या व्यसन उपचार क्लिनिकला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वडसा, सिरोंचा, मूलचेरा, अहेरी, कुरखेडा, आरमोरी व चामोर्शी येथील क्लिनिकचा लाभ घेत एकूण 62 रुग्णांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.