Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडा व तळेगाव येथील दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

कुरखेडा पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कुरखेडा, 12 मे – कुरखेडा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त मोहीम राबवित कुरखेडा व तळेगाव येथील दोन विक्रेत्यांचा दारूसह मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची कारवाई केली. कुरखेडा शहरातील कुंभीटोला मार्गावर नदीजवळ अवैध दारूविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने घटनास्थळी भेट देऊन १० लिटर मोहफुलाचा दारू जप्त करीत संबंधित विक्रेत्यार गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी कारवाई तळेगाव येथे करण्यात आली. येथील एका विक्रेत्याकडून ५० लिटर मोहफुलाच्या दारूसह ५० किलो मोहफुलाचा सडवा जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.शि संतोष कांबळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे विनोद पांडे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.