Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुडसा लगतच्या झुडपी जंगलात आढळला मृत बिबट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  31 ऑक्टोबर :- गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटातील कक्ष क्रमांक 168 मधील मुडझा गावालगतच्या झूडपी जंगलात मृत बिबट वनकर्मचार्यांना गस्तीच्या दरम्यान आढळून आला. मृत बिबट हा अंदाजे दिड ते दो वर्षाचा असावा असा अंदाज असून या बिबट्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही आहे. या बिबट्याच्या मृत शरीराचे शवविच्छेदन पोटेगाव चे पशुधन विकास अधिकारी डॉ. बि.ए. रामटेके यांनी केले. प्राथमिक स्वरूपात मृत्यूचे कारण अद्याप कळले नसले तरी गोळा केलेल्या नमुन्याचे परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यू चे कारण समोर येईल. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याला सर्वांसमक्ष अग्नी देण्यात आली.

बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने गस्तीवर असणार्या वनकर्मचार्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. या माहितीवरून गडचिरोली उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनरक्षक गौरव हेमके, भसारकर, वाघ संनियंत्रक पथक गडचिरोली व अधिनस्त वनाधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळावर जाउन पाहणी केली. प्राथमिक चौकशी केली असता, शरीराचे सर्व अवयव शाबुत अल्याने व आजुबाजूला शिकारी बाबत कुठलेही ठोस पुरावे नाही मिळाले. या संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर, ग्रापं मुडझाचे पोलीस पाटील लोचन मेश्राम, तुलाराम राउत, सुरेखा सुरपाम उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर प्रकरणावरुन आजुबाजुच्या परिसरात बिबट व त्यांचे शावक असल्याचे संशय व्यक्त केल्या जात आहे. घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आव्हान सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली  अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे. सदर घटनेची चौकशी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली अरविंद पेंदाम हे करीत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.