Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चारचाकी वाहन चालवतांना मागील सीटवर बसणार्यांना सीटबेल्ट आवश्यक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 31 ऑक्टोबर :-  चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणार्या प्रवाशांना उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणार्यांना दंड होवू शकतो.

आपल्या देशात वाहतुकीशी संबंधित वेगवेगळे ट्रॅफिक नियम आहे आणि हे नियम मोडल्यास नागरिकांना दंड ही भरावा लागतो. तरीही भारतातील लोक या नियमांच्या बाबतीत उदासीन असून दुचाकीवर हेल्मेट वापरणे, गाडी चालवतांना लायसन्स सोबत ठेवणे, फोनवर ना बोलने, सीट बेल्ट लावणे सारख्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बाढते. याच दरम्यान चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणार्या प्रवाशांना 1 नोव्हेंबर पासून सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्थ्ज्ञा नही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली 15 दिवसांची मुदत आज सोमवारी संपत आहे. त्यामुळे सहप्रवाशाला केलेल्या हेल्मेट सक्तीप्रमाणे ही सक्तीदेखील दुर्लक्षित करण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक राज्यामंध्ये रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी शुरू करण्यात आली असून नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सीटबेल्ट नाही लावल्यास देडास पात्र धरण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मुदत 31 ऑक्टोबरला संपत असल्याने मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल. ओला, उबर सारख्या एपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी टॅक्सीमध्ये बेल्ट बसविण्यात अडचणी येत आहेत.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.