Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसई : अग्रवाल परिसरातील उघड्या डीपीला भीषण आग

प्रसंगवधान राखत नागरिकांनी  विझवली आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 31 ऑक्टोबर :- डीपीची उघडी झाकणे, त्यामुळे महावितरणच्या डीपीला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वसई पश्चिमेला असलेल्या अग्रवाल परिसरात काल रात्री ९.३० च्या सुमारास महावितरणच्या उघड्या डीपीला भीषण आग लागली. आग लागल्यावर तातडीने परिसरातील नागरिकांनी प्रसंगवधान राखत डीपीला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आग विझवली.

काही दिवसांपूर्वी वसईतील स्टेला परिसरात देखील अशाच प्रकारे डीपीला आग लागून घबराट निर्माण झाली होती. डीपीला आग लागल्यावर मोठा आवाज होतो. त्यामुळे नागरिक भयभीत होतात. मात्र महावितरणला याचे काहीही घेणेदेणे नाही. एखाद्या नागरिकाचे वीज बिल थकले की त्याची लाईट कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तत्काळ हजर होतात. मात्र वारंवार लोडशेडींगमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा किती त्रास होतो हे महावितरणला कधी कळणार?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महावितरणच्या डीपी नेहमीच उघड्या असतात. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष असते. यामुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल वसईतील नागरिक विचारीत आहेत.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.