Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अद्रक शेतीतून शेतकऱ्याने शोधला शाश्वत उत्पादनाचा मार्ग…

दोन एकरात १६ टन उत्पादन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नंदुरबार 1 डिसेंबर :- शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय आहे मात्र शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकते हे दाखवून दिला आहे ते शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील. शेतकरी जितेंद्र पवार यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत पवार यांनी अद्रक शेती करत अद्रक शेतीतून शाश्वत उत्पादन मिळवले आहे.

राजेंद्र पवार राजेंद्र पवार यांच्याकडे 14 एकर जमीन असून त्यांची काही जमीन गावाजवळ आहे गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव प्राणी आणि इतर कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे त्यामुळे त्यांनी या पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत अद्रक शेती करण्याचे नियोजन केले त्यासाठी अद्रक चे बेणे नाशिक येथून वीस रुपये किलोने खरेदी केले. आता त्यांनी आपल्या आद्रक काढण्यास सुरुवात केली असून मध्य प्रदेश मधील व्यापारी जागेवर चाळीस रुपये किलो दराने त्यांच्याकडून अद्रक ची खरेदी करत आहेत त्यांना आतापर्यंत दोन लाख रुपयाचा खर्च झाला आहे. तर पावणे दोन एकरात दहा लाखापर्यंतच्या उत्पादनाचा अंदाज आहे खर्च वजा जाता त्यांना आठ लाख रुपये निवड नफा राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बाजारपेठेचा अंदाज पाहून शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शाश्वत उत्पादनाचा मार्ग खुला होत असतो बाजारपेठेत आद्रक ला चांगल्या प्रकारची मागणी असते हे लक्षात घेत पारंपरिक पिकांना फाटा देत राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.