Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उपस्थित भत्त्यात पंचवीस वर्षात वाढ नाही…..

मुलींना दरदिवशी मिळतो १रुपया उपस्थिती भत्ता....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 1 डिसेंबर :- आज च्यां महागाईच्या काळात एक रुपयात खोड रबर सुद्धा येत नसते मात्र दारिद्र्यरेषे खालील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रति दिवस १ रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थिनींचे उपस्थिती वाढावी म्हणून राज्य सरकारने 10 जानेवारी 1992 ला प्राथमिक शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थिनींना उपस्थिती अनुदान म्हणून एक रुपया देण्याची सुरुवात केली त्याला पंचवीस वर्षे झाल्यानंतर हे या अनुदानात कुठल्याही प्रकारची वाढ केली गेली नाही पंचवीस वर्षात राज्यातील एकही राजकीय नेत्यांनी किंवा शिक्षण विभागाने या सानुग्रह अनुदान आत वाढ होण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे चित्र दिसून येत आहे..

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थिनींची पटसंख्या वाढावी म्हणून सरकारकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उपस्थिती सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली या योजनेत शालेय दिवसात विद्यार्थिनी जितके दिवस उपस्थित राहतात इतक्या दिवसांचे एक रुपया प्रमाणे सानुग्रह अनुदान दिले जात असते.मात्र गेल्या वर्ष भरापासून त्यासाठी ही अनुदान उपलब्ध नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या पंचवीस वर्षात महागाई च्या नावाखाली सरकारी नोकर आणि लोकप्रतिनिधी यांनी आपल्या पगारात प्रचंड वाढ करून घेतली मात्र ग्रामीण भागातील शाळा मध्ये यांची उपस्थिती वाढावी जाणाऱ्या सानुग्रह अनुदानात वाढ करावी अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.