Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आधार कार्डमुळे एका मुलीला मिळाले तिचे आईवडील

अकोला रेल्वे स्थानकात सापडली होती मुलगी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अकोला 10 सप्टेंबर :- गुजरात येथून हरवलेल्या १७ वर्षीय बालीकेला गुरुवारी ८ रोजी अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अकोला रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनच्या टीमला ही बालीका भटकतांना निर्देशानात आले. या बालीकेस विचारपूस करुन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रम, अकोला येथे दाखल करुन तिचा आतापर्यंत सांभाळ करण्यात आला. संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

अकोला रेल्वेस्टेशन येथे १० जून रोजी १७ वर्षीय बालीका भटकताना निदर्शनास आली. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकीला विचारपूस केली मात्र ती गोंधळलेली स्थितीत औरंगाबाद येथील असल्याची वारंवार सांगत होती. त्यानुसार औरंगाबाद येथील पोलिस यंत्रनांद्वारे समन्वय साधून शोध सुरु केला. परंतु बालीकेच्या दिलेल्या माहितीनुसार कोणताच पुरवा मिळाला नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध मोहिम राबविण्यात आली. या बालिकेचे मानसिक स्वास्थ मंद असल्याने तिला समजण्यास अडथळा येत असे. अशा परिस्थितीत तिच्या पालकाविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर पेच उभा राहिला. या बालीकेचा शोध घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर व गायत्री बालीकाश्रमाच्या अधिक्षक वैशाली भटकर यांनी आधार कार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या बालीकेच्या परिवाराचा शोध सुरु केला. पंरतु बालीकेच्या बोटाचे ठसे स्पष्ट दिसत नसल्याने आधार कार्डवर नोंदणी झाली असल्याची माहिती मिळू न शकल्याने तिच्या परिवाराचा पत्ता मिळू शकला नाही.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू

Comments are closed.