Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस ठाणे राजाराम येथे भव्य महिला मेळावा संपन्न

गरजू महिलांना साड्या व घरगुती साहित्य वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गुड्डीगुडम (गडचिरोली), 9 मार्च :- उप पोलीस स्टेशन राजाराम खां येथे मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा.अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे सा., अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख सर यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य बेबी मडावी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे अध्यक्ष अधि.रुपाली गेडाम तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मनोज येलमुले वैद्यकीय अधिकारी कमलापूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत मोबिलयाजर अनिता आलाम, सुनीता बामनकर अंगणवाडी मदतनिस,पूजलवार मुख्याध्यापक जी प शाळा मरनेली, शिक्षक राऊत, पसपुनुरवार राजाराम, एन. एम. धकाते औषधी निर्माता आरोग्य पथक राजारामयांनी उपस्थित होते.
या प्रसंगी अधि. गेडाम यांनी कायदे विषयक व महिला जनजागृत बाबत मार्गदर्शन केले आणि प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड यांनी सुरक्षेबाबत माहिती आणि दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती देऊन शासकीय योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी हद्दीतील गरजू महिलांना साड्या व घरगुती वापरातील साहित्य वाटप व शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे कित वाटप करण्यात आले.तसेच आभा कार्ड, ई -श्रम कार्ड, पॅन कार्ड व संजय गांधी निराधार योजनेचे वश्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन पो. हवालदार माधुरी अवधान तर आभार प्रदर्शन पोउनि. अजिंक्य जाधव यांनी केले. यावेळी हद्दीतील २५० ते ३०० महिला पुरुष उपस्थित होते.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.