Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्ली महापालिकेत ‘आप’चं सरकार.

15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 7 डिसेंबर :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने  दिल्ली महापालिकेतील  भारतीय जनता पक्षाची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार  AAP ने आतापर्यंत 130 जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने  आतापर्यंत 97 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 7 तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसचा सुपडा साफ

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आम आदमी पार्टीने  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत  पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि आतापर्यंत 130 जागा जिंकल्या आहेत. एमसीडीमध्ये 250 वॉर्ड आहेत आणि बहुमताचा आकडा 126 आहे. एक्झिट पोलने दारुण पराभवाचा अंदाज वर्तवलेल्या सत्ताधारी भाजपने आतापर्यंत 99 वॉर्ड जिंकले आहेत. अवघ्या सात जागा जिंकून काँग्रेस खूपच मागे पडली होती आणि मागेच पडली. मागील निवडणुकीत 30 जागा जिंकल्या होत्या. यावेळी निराशाजनक कामगिरी केलेय. ईशान्य दिल्लीतील सीलमपूरमधून शकीला बेगम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली आणि सुरुवातीच्या ट्रेंडने भाजपने केजरीवाल यांच्या पक्षापेक्षा मोठी आघाडी घेतली होती. परंतु मतमोजणी जसजशी पुढे सरकच होती तसतसा निकाल आपच्या बाजूने फिरला. या वर्षाच्या सुरुवातीला MCD पुन्हा एकत्र झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. यापूर्वी 2017 च्या दिल्लीतील नागरी निवडणुकांमध्ये, भाजपने त्यावेळी 270 नगरपालिका वॉर्डांपैकी 181 जिंकले होते, तर AAP फक्त 48 जिंकले होते आणि काँग्रेस 30 जागा जिंकत तिसऱ्या स्थानावर होती. यावेळी काँग्रेसची कामगिरी निराशाजणक पाहायला मिळाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.