अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रस्तावास मान्यता मिळून देण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच स्विकारतांना ACB रंगेहात पकडले
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आरोपी गोविंद विष्णू महाविद्यालयाचा लिपिक विलास सोनुने.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
बुलडाणा, 13 जून – अनुकंपा तत्वावरील नोकरीचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी कार्यालयातून मंजूर करून आणण्याबाबत एक लाख रुपयाचे स्वीकारताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील गोविंद विष्णू महाराज विद्यालयाच्या लिपिक विलास सोनुने याला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका युवकाचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा प्रस्ताव बुलढाणा शिक्षणाधिकारी पाठवण्यात आला होता सदरहू प्रस्तावास मान्यता मिळून देण्यासाठी गोविंद विष्णू महाविद्यालयातील लिपिक विलास सोनुने यांनी संबंधित युवकाला दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार 12 जून रोजी मलकापूर येथील बस स्थानक परिसरात असलेल्या रसवंती मध्ये सदर इसमांकडून एक लक्ष रुपयाची लाच स्वीकारताना लिपिक विलास सोनुने याला लाच लुचपत विभागाच्या बुलढाणा येथील पथकाने जेरबंद केले त्याच्याविरुद्ध विविध नोंद करण्यात आले आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.