Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली राणी दुर्गावती विद्यालय येते “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 07 जानेवारी 2024: विद्यार्थ्यांना शैक्षणिक आवड व रुची निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळावी, जीवनात एक ध्येय ठेवून समोर जावा. या दृष्टिकोनातून महत्वाचा उपक्रम राबविला जात आहे. माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्या येत आहे.

अभियानाची उहिष्टे आहे की, शिक्षणासाठी पयांवरण पुरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांची शेर्माणक गुणवत्ता विकसित करण्यावरीवरय अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, क्रोडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता पावावत विद्याथ्यांना प्रोत्साहित करणे, विद्याथ्योच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण.असे वेगवेगळ्या उपक्रमातून माजी विद्यार्थी मेळावा आलापल्ली राणी दुर्गावती विद्यालय येते राबविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक लोनबोले सर, सहशिक्षक पहापाळे सर आणि गोबाडे सर तसेच माझी विद्यार्थ्यांची उपस्थिती होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.