Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुन्हा; गडचिरोलीत वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

सचिन कांबळे

उत्तर गडचिरोलीमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात असून दोन ते तीन वर्षात वन्यजीव- मानव संघर्ष निर्माण झाला आहे . अशातच पुन्हा जंगली हत्ती दोन वर्षापासून शिरोली जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून लगतच्या गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील सीमा भागात धुमाकूळ घालून पिकांचे नुकसान करीत दोघांना चिरडून मारले होते .त्याची दहशत कायम असतानाच पुन्हा दक्षिण गडचिरोलीत वाघाचा वावर वाढला आहे. यामुळे  दक्षिण गडचिरोलीतील मुळचेरा, अहेरी, एटापल्ली या ठिकाणी मोठी घटना वगळता गावातील गाय, बैल,जनावरांवर वाघाने हल्ले सुरू होते तर कधी शेतातून अथवा जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावरून मार्गक्रमण करतांना दिसून येत असल्याने वनविभागानेही जागृत राहण्यासाठी दिवंडी दिली होती. जागोजागी वाघांच्या हालचालीवरून फलक लावून जनमानसात जनजागृती करीत होते. मात्र   भर दिवसा गावा लगत असलेल्या चिंतलपेठ येथील एका शेतात हल्ला करून महिलेला ठार केल्याने दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, मुलचेरा, एट्टापल्ली ग्रामीण भागात वाघाची दहशत निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ०७ जानेवारी : अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे शेतात काम करीत असताना एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव सुषमा देविदास मंडल (५५)असून चिंतलपेठ येथील रहिवासी असून सध्या कापूस काढणीचे हंगाम सुरू आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशातच गावातील गोंदूबाई कान्होबा दुर्गे यांच्या शेतात कापूस काढण्यासाठी घरातली शेतकऱ्यांची परिवारातील आणि मृतक महीला अशा दोघीजणी आज सकाळी 9:30  दरम्यान कापूस काढत असताना अचानक समोरून वाघ सरळ दिशेने येताना दिसताच आरडाओरड करीत सैरावैरा पळू लागल्या .

मात्र वाघ अधिक आक्रोशात  येत मृतक महिलेला लक्ष वेधत थेट हल्ला चढविल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर सोबत असलेली महीला शेतातून कशीबशी सुटका करीत घरी पोहचली आणि झालेली आपबिती घरच्यांना सांगितली, घरच्यांनी गावकऱ्यांना सांगितली, घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिक अकाच धावा करीत घटनेस्थळ गाटला. तो पर्यंत वाघ महिलेला ठार करून जंगलाच्या दिशेने निघून गेला होता.

झालेल्या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी वन विभागाला आणि पोलीस विभागाला दिली, मात्र वन विभागाचे अधिकारी, तसेच पोलीस अधिकारी उशीरा पोहचल्याने गावकऱ्यांचा मनस्ताप वाढला. त्यामुळे वनाधिकाऱ्याना गावकऱ्याच्या आक्रोशाला समोर जावे लागले. दरम्यान वनाधिकारी संयमाने नागरिकांशी संवाद साधत घटनास्थळी पोहचून पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या तयारीत होते.

मात्र गावातील नागरिक वाघांच्या दहशतीत  सापडल्याने आणि उभ्या पिकांचे नुकसान होईल या भीतीने आधी वाघाचा बंदोबस्त करा. नंतरच मृतदेह उचला अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणाव पूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना लेखी आश्वासन देत वाघाचा बंदोबस्त करणारं हे स्पष्ट केल्याने गावकऱ्यांनी वन विभाग तसेच पोलीस विभागाला पंचनामा करून शविच्छेदन करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. त्या नंतरच वनविभागाने सुटकेचा निःश्वास घेतला.

हे देखिल वाचा:

गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविली जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जुनपासून प्रवेश – देवेंद्र फडणवीस

 

Comments are closed.