Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब रूग्णांसाठी करावा

माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन, राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण, स्व.मल्लाजी आत्राम यांच्या स्मूर्तीप्रित्यर्थ माजी आमदार दिपक आत्राम यांच्याकडून आदिवासी लोकसेवा फाउंडेशनला रुग्णवाहिका भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी,  22 ऑक्टोबर :-  आदिवासी लोकसेवा फाउंडेशनला दिलेल्या रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब आणि गरजूं रूग्णासांठी करावा असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले आहे. राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या स्मृतिदिना निमित्त आलापल्ली येथे गोंड मोहल्यातील गोटूल समाज मंदिरात आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक  आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा मोठया थाटात पार पडली.

मागील एकमहिन्यापूर्वी येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे बांधवांनी माजी आमदार दिपक आत्राम यांची भेट घेऊन आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनला रुग्णवाहिकेची नितांत गरज असून समाजातील गरीब रुग्णांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर, गडचिरोली किंवा नागपूर ला खाजगी वाहनाने ये-जा करने आर्थिक अडचणीचे ठरत असून आपल्याकडून रुग्णवाहिका भेट दिल्यास समाजातील गरीब व गरजू रुग्णांची अडचण दूर होईल म्हणून त्यांच्याकडे रुग्णवाहिका भेट देण्याची मागणी केली होती. यावेळी माजी आमदार दिपक  आत्राम यांनी आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यावर नक्कीच विचार करू असे त्यांना आश्वस्त केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता माजी आमदार दिपक आत्राम राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून व त्यांचे वडील स्व.मल्लाजी आत्राम यांचे स्मृती प्रित्यर्थ आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनला स्वतःकडून रुग्णहवाहिका भेट देऊन केली.

यावेळी रुग्णवाहिकेची लोकार्पण माजी आमदार दिपक  आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, प्रतिष्ठित नागरिक ईश्वर वेलादी, शंकर सिडाम, सुमनबाई सिडाम, रघुपती सिडाम, मुरलीधर सडमेक, मीराबाई सडमेक, माजी सरपंच विजय कुसनाके, कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी, ग्रा.पं. सदस्या माया कोरेत, ग्रा.पं. सदस्य संतोष अर्का, ग्रा.पं. मनोज बोल्लूवार, उमेश आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे बांधवांनी फाऊंडेशनला रुग्णवाहिका भेट दिल्याबद्दल माजी आमदार आत्राम यांचे आभार मानले. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे यशस्वी आयोजनासाठी फाऊंडेशनचे मधुकर मेश्राम, प्रकाश कोरेत, नागेश मेश्राम, राजू वेलादी, अविनाश मेश्राम, रुपेश आत्राम, सुरज मडावी, प्रतीक गेडाम, सुरज मेश्राम, तिरुपती वेलादी, दिपक मेश्राम, राहुल सडमेक, जगन्नाथ सिडम, रितीक आत्राम, मनोज सडमेक, अतिष कुमरे, राहुल सिडम, सुनील आत्राम, सचिन सिडाम आदीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

हे पण वाचा :-

देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’

Comments are closed.