Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐन दिवाळीत करंट लागून गेला लाईनमनचा जीव

विज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पोंभूर्णा, 22 ऑक्टोबर :- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाउ नये म्हणून एका पोलवर दुरूस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन ला करंट लागुन जीव गेल्याची घटना पोंभुर्णा उपपोलीस स्टेशन हद्दितील चेक हत्तबोडी येथे आज शनिवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान समोर आली. दिपक पेंदाम (32) असे मृतकाचे नाम असून तो खेडी सावली येथील रहिवासी है। डिपीवरील लाईन बंद असल्याने तो दुरूस्त करण्यासाठी चढला. काही वेळ काम केल्यानंतर अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्याला करंट लागला आणि तो गतप्राण झाला.

या घटनेला विज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. लाईनमन पोल पर चढल्यानंतर विज प्रवाह सुरूच कसा झाला? असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहे. मृतकाच्या कुटूंबाला 50 लाख रूपयांची आर्थिक मदत व तत्काळ नोकरी देण्यात यावी यासाठी गावकर्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे थोडावेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळ गाठुन परिस्थिती हाताळली. यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी नातेवाईकांनी केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. त्यानंतरच मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालय पोंभुर्णा येथे नेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, उमरी येथील ठाणेदार किशोर शेरकी, कार्यकारी अभियंता तेलंग, माजी सभापती अल्का आत्राम, माजी सभापती विजय कोरेवार, रूपेश निमसरकार, सरपंच बंडू बुरांडे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार व गावाती नागरीक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब रूग्णांसाठी करावा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’

Comments are closed.