Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

T20 World cup 2022 : न्यूझिलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

तब्बल 11 वर्षानंतर न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियात पहिला सामना जिंकला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

T20 World cup 2022 22, ऑक्टोबर  :-  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं 2021 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पराभवाचा वचपा काढला.  सिडनी क्रिकेट मैदानावर  नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं डेवॉन कॉन्वे (नाबाद 92) आणि फिन ऍलन (42) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर टीम साऊथी आणि मिचेल सँटनेरच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघानं गुडघे टेकले. अवघ्या 111 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं इतिहास रचला. तब्बल 11 वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियात पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलाय.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर एकाही खेळाडूला अधिक काळ चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडनं आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 20 सामन्यांत केवळ पाच वेळा विजय मिळवला आहे. दोनदा अशी कामगिरी करणारा केन विल्यमसन हा एकमेव किवी कर्णधार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.