Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय तंत्रनिकेतन गडचिरोली येथे प्रवेश घेण्यासाठी आवाहन

जिल्हयातील इच्छूक 623 विद्यार्थ्यांची नोंदणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि.10 : शासकीय तंत्रनिकेतन साठी प्रवेश घेणेकरीता जिल्हयातील 623 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी जिल्हयातीलच शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रार्चाय डॉ.बोराडे यांनी केले आहे. गडचिरोली येथील संस्थेत जिल्हयातील विद्यार्थ्यांना 70% जागा राखीव आहेत. तसेच इतर जिल्हयातील विद्यार्थ्यांना 30% जागा राखीव आहेत. जिल्हयातील इच्छूक 623 विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करुन इच्छा दर्शविली आहे. आपल्या जिल्हयातील प्रशस्त अशा ठिकाणी प्रवेश घेऊन त्यांनी तंत्रशिक्षण आत्मसात करावे असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे. सद्या राज्य स्तरावरुन याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अंतिम गुणवत्ता यादी 12 डिसेंबर रोजी जाहिर होणार असून विद्यार्थ्यांनी 19 डिसेबर पर्यंत ऑनलाईन स्वरुपातच प्रवेश नोंदवावा. याबाबत सविस्तर तपशील तंत्रनिकेतन शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली शहरापासून आठ किमी अंतरावर इंदाळा येथे असलेल्या कॅम्पसमध्ये स्वच्छ वातावरणात इमारत वसलेली आहे. या ठिकाणी 10 वी किंवा 12 वी उर्तीण विद्यार्थ्यांना स्थापत्य, यंत्र, विद्यूत , संगणक तसेच अणुविद्यूत व दुरसंचार अशा वेगवेगळया पाच अभ्यासक्रमातून भविष्य उज्जवल करण्याची संधी आहे. या ठिकाणी 200 मुलींसाठी व 300 मुलांसाठी सुसज्ज वस्तीगृह उपलब्ध आहे. 1985 सालापासून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी कॅम्पस मूलाखतीमधून 50 हून अधिक विद्यार्थी व्हीडीओकॉन, एल एण्डी टि, महेन्द्रा ॲण्ड महेन्द्रा उद्योगामध्ये नोकरीला लागले. तसेच इतरही ठिकाणी नोकरी मिळालेली संख्याही मोठी आहे. जिल्हयातील स्थानिक मुलांना जिल्हयातच तंत्रशिक्षण घेण्याची संधी आहे. या शिक्षणासाठी मागास वर्गीय विद्यार्थ्यांना 1725 रु. शुल्क असून खुला प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांना 7725 रु.शुल्क आहे. तसेच शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्याही पात्रतेनूसार या ठिकाणी मिळतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली येथील तंत्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी प्रा.पी.एस.चलाख 8275698730, प्रा.गजभे 9545652326 व प्रा.निखारे 7387016111 या क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थे कडून आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.