Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॅरी फॉरवर्ड लागू करा ; सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांची मागणी

कुलगुरूंना मागणी पत्र सादर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हे अति मागासलेले तसेच नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो. आणि या भागात शिक्षणाची सोय नसल्याने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र विद्यापीठात पाहिजे तशा शिक्षणाची सोय नसल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधेपासून वंचित राहावं लागत आहे. एवढेच नव्हे तर आवड असलेल्या शैक्षणिक विषयात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. जे शिक्षण आहे ते घेऊन विद्यार्थ्यांना समोर जावे लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठामार्फत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात पाहिजे तसे यश आले नाही त्यामुळे गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना मोठ्या शिक्षणाच्या यातना भोगाव लागत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्र रेषेखालील मोडणारे परिवार असून शिक्षणासाठी पैसेही भरू शकत नाही एवढेच नव्हे तर परीक्षा फी भरू शकत नाही अशी नामुष्की विद्यार्थ्यावर येते आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांचे वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षित करण्यासाठी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम निर्धार केला असून वंचित विद्यार्थ्यांच्या भविष्याचा ही शैक्षणिक विकास करून भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक प्रशांत बोकारे यांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कॅरी फॉरवर्ड बाबत सूचना दिल्या असून येत्या सात दिवसात आपल्याला प्राप्त असलेल्या अधिकाऱ्यांचे वापर करून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तनुश्री आश्रम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

यावेळी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, मयूर कलवल,अभिजित लिहितकर,आकाश बूटोलिया,महेश गौरकर,सैनिक रामटेके,शशांक मंडलवार,अभिषेक ढोलकीया,रोहन गेडाम,चारुदत्त गेडाम,अमित घोष,आचल निमगडे,निकिता गौरकर,प्रियंका देशपांडे,अदिती गेडाम,प्राची नेवारे,सुश्मिता बुरला,रियाल गेडाम,अनवाज कुरेशी, सलमान खान
व आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.