Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोघे एकमेकांना गद्दार म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का – अजित पवार यांचा सवाल

धनुष्यबाण गेला आता काय होईल अजित पवार चे उपमुख्यमंत्री पद गेले आता काय करत असेल अशी चिंता सोडा -  अजित पवार 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बारामती 9 ऑक्टोबर :-  महागाई वाढलेली आहे.अनेक प्रश्न आ वासून उभे असताना शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. यातून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का ? अडचणी दूर होणार आहेत का ? याचा कुठेतरी विचार करायला हवा लोकशाहीचा खेळ खंडोबा  चाललेला आहे. कुणीही कोणतीही माणसे फोडत आहेत.अधिकाऱ्यांची सुद्धा तारेवरची कसरत चालू आहे. कोणाच्या ऐकावे असा प्रश्न त्यांना पडत आहे. यातून विकासावर परिणाम होत आहे.असे म्हणतानाच  दादा आपली सत्ता पाहिजे असे एक जण म्हणाल्यावर भाषणातच अजित दादा म्हणाले त्यासाठी 146 चा आकडा पाहिजे. म्हणजे मटक्याचा आकडा नाही असे म्हणतात सभेत अशा पिकला. त्यावर पुढे अजित पवार म्हणाले मित्रांनो शेवटी बहुमत महत्त्वाचे आहे विरोधी  पक्ष नेते अजित पवार हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात तर दसरा मेळाव्यात मानसे  उठून का चालली होती ? पखुर्च्या रिकाम्या का  झाल्या. आता आपल्या सभेत शेवटपर्यंतचा जो माणूस आहे तो स्वतःहून आलेला आहे. असे म्हणतात एका कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा असे घोषणा देताना राहू देते पुढच्या निवडणुकीला आपल्याला लागेल असे म्हणत एकच अशा पिकला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धनुष्यबाण गेले आता काय होईल शिवसेना पक्ष ही बाजूला केला आता काय होईल काय व्हायचं ते त्यांचं होईल आपला प्रपंच बघा आता अजित पवार चे उपमुख्यमंत्री पद गेले आता तो काय करत असेल मी कामच करत आहे. काळजी करू नका असे म्हणत चिंता करू नका तुमचेच ऐकायचे आहे. तुमच ऐकलं तरच नाहीतर माझे समोरचे बटन तुम्ही दाबणार नाही अशी मुश्किल टिप्पणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले आहे.

आम्ही सत्तेत असताना सर्व आमदारांना बरोबर घेऊन काम करत होतो.  एकनाथ शिंदे आमच्या बरोबर होते.. पण ते कधी म्हणाले  नाहीत की मला मुख्यमंत्री व्हायचे आहे ते म्हणाले असते तर उद्धव ठाकरे यांना सांगितले असते की आता तुम्ही थांबा एकनाथरावांना मुख्यमंत्री करा पण ते कधी गेल ते कळलेच नाही असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.