Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात 12 फुटी अजगर पकडला.

तब्बल ०९ बकऱ्या फस्त करणारा अजगर पकडण्यास यश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर 9 ऑक्टोबर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या उचली गावात गेल्या १ वर्षा पासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. तब्बल ०९ बकऱ्या फस्त करणारा 12 फुटी अजगर पकडण्यात अखेर यश आले आहे. ग्रामस्थांना गावालगत शेतशिवरात एक महाकाय अजगर सतत दिसायचा. या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल ९ बकऱ्या फस्त केल्या. अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे,तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते.

दरम्यान शेतकरी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली.ही माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गायझेशन संस्था सदस्यांना देण्यात आली. सर्पतज्ञ ललित उरकुडे,विवेक राखडे चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडले. महाकाय अजगर जेर बंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. हा अजगर एकूण १२ फूट लांबीचा होता.या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- 

शिवसेनेचे अखेर ठरल !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.