Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

या महापालिकेत भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जळगाव: 15 मार्च जळगाव महापालिकेत भाजपचं स्पष्ट बहूमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तर 18 मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर रवाना झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शिवसेनेकडून महापालिकेवर भगवा फडकवला जाण्याची शक्यता शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला 4 दिवस शिल्लक असतानाच जळगावात राजकीय भूकंपाचं चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा सुरु आहे. भाजपमधील काही सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप जारी करण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसंच महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचं नावही निश्चित केलं आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महापालिकेत भाजपचं बहुमत असलं तरी पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंभाजपविरोधात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीतच आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. पण महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी मध्यंतरी खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नॉट रिचेबल होण्यामागे खडसे यांचाही हात असल्याची चर्चा सध्या जळगावात सुरु आहे.

Comments are closed.