Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी ते आलापल्ली मार्गावर पक्या सिमेंट रोडचे बांधकाम करण्यासाठी अशोक आईंचवार यांनी पत्राद्वारे ना. नितीन गडकरी यांना केली मागणी

अहेरी ते आलापल्ली सिमेंट रोडचे बांधकाम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक आईंचवार यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि २६ ऑक्टोबर : अहेरी शहराला राजघरानाचा वारसा लाभल्याने अख्या महाराष्ट्रात वेगळीच ओळख असून गडचिरोली जिल्हात अहेरीला उपविभाग म्हुणुन ओळखल्या जाते ,राज परीवाराशिवाय सर्वच प्रशासकीय कार्यालय अहेरी ,आलापलीतच आहेत. याशिवाय अहेरी जिल्हाची मागणी कीत्येक वर्षापासून रेंगाळत आहे.  अहेरी उपविभागात पाच तालुक्याचा समावेश आहे .नागरिकांना  सदैव  कुठल्या न कुठल्या कामानिमित्य शासकीय कार्यालयात, शेतीसाठी लागणारी साहित्यासाठी,आरोग्यासाठी, जीवनावश्यक वस्तूसाठी आवागमन करावे लागते .

सध्या अहेरी ते अल्लापली मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून प्रशासन फक्त दरवर्षी  तात्पुरती डागडुजी करून वेळकाढू धोरण राबवीत आहेत,सध्या अहेरी -अल्लापली मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात  खड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना तारावारची कसरत करून वाहने चालवावी  लागत होती. रात्रीच्या वेळी या मार्गावर ये जा करताना खडड्यातून वाहन जाऊन कित्येकांचे अपघात झालेले आहेत. हीच  परिस्थीती कायम राहिल्यास आलापल्ली-सिरोंचा मार्गाची  जी अवस्था झाली तीच अवस्था अहेरी-आलापल्ली मार्गाची होण्यास वेळ लागणार नाही .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यासाठी फक्त अहेरी-आलापली मार्गाची  डागडुजी करून मार्ग दुरुस्त होणार  नाही. त्यासाठी पक्के रस्त्याची गरज आहे.तेव्हाच  हा मार्ग खड्डे मुक्त  होणार असल्याने पक्या सिंमेट मार्ग करण्याची  नितांत गरज लक्षात घेवून अहेरी ते आलापल्ली पर्यंत सिमेंट रोड  बनविण्यात यावे  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक आईंचवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

Comments are closed.