Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकस्पर्श न्यूज चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २५ ऑक्टोंबर : अल्पावधीतच राज्यात लोकप्रिय ठरलेल्या लोकस्पर्श न्यूज चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरी येथील केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ३७ बटालियन चे कमांडंट मोहनदास खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ बटालियन चे कमांडंट आर. एस. बाळापूरकर, आलापल्ली चे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, प्राणहिता वनप्रकल्प विभाग आलापल्ली चे विभागीय व्यवस्थापक देवानंद चांदेकर, ग्रामपंचायत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोणे, राणी दुर्गावती विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन लोनबले, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापल्लीचे प्राचार्य प्रमोद मेश्राम सर, आलापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेचे प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना कमांडंट खोब्रागडे म्हणाले की, सोशल मीडियाच्या युगात आज बातमी मोठ्या वेगाने प्रसारित होते, मात्र इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामध्ये सर्वात आधी बातमी देण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे कधी कधी अर्धसत्य, अपूर्ण बातम्या ही प्रसारित होतात. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतं आहे. लोकस्पर्श सारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न समोर आणण्याचे विधायक काम सुरु आहे. या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न यांच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडले जात आहे. आणि हे काम अविरत त्यांनी समोर सुरु ठेवावे अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी लोकस्पर्श न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्य मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक ओमप्रकाश चुनारकर यांनी लोकस्पर्शच्या एका वर्षाच्या वाटचालीवर आपले मनोगत व्यक्त केले. लोकस्पर्शच्या एका वर्षाचा कामगिरीचा आढावा त्यांनी सांगितला व वाचक, प्रेक्षक व जाहिरातदारांचे दिलेल्या सहयोगाबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक मिलिंद खोंड तर आभार नागेश इरबतूनवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन कांबळे, शुभम कांबळे, सुदीप्त रॉय, रुबिना रॉय, राजू करमे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.