Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा

प्रति एकर १८ क्विंटल मका हमी भावाने खरेदी करण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि.15 जून :  शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान पिकांची विक्री होऊन नवीन हंगाम जवळ आलेला असतांना देखील राज्य शासनाने घोषित केलेले ६०० रुपये प्रति क्विंटल बोनस शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यथाशिग्र पेरणीच्या पूर्वी बोनस मिळण्यासाठी खा. अशोक नेते यांनी काल दि. १४ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व यासंदर्भात निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने बोनस मिळण्यासाठी राज्य प्रशासनास निर्देशित करून मकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति एकर १८ क्विंटल मका हमी भावाने खरेदी करण्याच्या सूचना राज्य शासनास देण्याची मागणी खा. अशोक नेते यांनी राज्यपालांकडे केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवेदनात खा. अशोक नेते यांनी सांगितले की, खरिपाचा हंगाम संपून ५ महिन्याच्या कालावधी लोटला, मात्र राज्य शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल ६०० रुपये बोनस अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. आता पेरणीचा हंगाम व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना तातडीने बोनस देने आवश्यक आहे, असेही खा. अशोक नेते यांनी राज्यपालांना सांगितले.

तसेच रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाचे उत्पादन घेतात परंतु हमीभावाने आदिवासी विकास महामंडळ तथा मार्केटिंग फेडरेशन व्दारे अद्यापही मका खरेदी सुरू झालेली नाही. मोजक्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यामुळे अनेक शेतकरी हमीभावाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा मका घरीच सडण्याची अथवा कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आलेली आहे. तरी याकडे विशेष लक्ष देऊन मका खरेदी तात्काळ सुरू करण्याचे आदेश निर्गमित करून खरेदीची मर्यादा एकरी १८ क्विंटल करण्यात यावी व शेतकऱ्यांना धानाचे बोनस त्वरित वितरित करण्याचे निर्देश आपल्या स्तरावर प्रशासनास द्यावे, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी राज्यपालांकडे केली असता यासंदर्भात लवकरच आदेश काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे अभिवचन राज्यपाल महोदयांनी दिले.

महामहिम राज्यपालांच्या भेटीदरम्यान ओबीसींचे नेते तथा भाजप ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा बाबुरावजी कोहळे, ओबीसी चे नेते तथा किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जि.प. चे कृषी सभापती तथा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पारधी, जिल्हा महामंत्री भास्कर बुरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

आरोग्याच्या पुरेशा सोयीसाठी गडचिरोलीत मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त करा

ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

 

Comments are closed.