Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड -१९ लसीकरण मोहीम संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  घेतली जनजागृती सभा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १४ जून : जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असलेल्या ९  ग्रामपंचायतीअंतर्गत गावांतील सरपंच, पोलीस पाटोल, वेदु, गायपुजारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, महिला बचतगटाचे अध्यक्ष इत्यादिंची जनजागृती सभा मालेवाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समस्त नागरीकांना स्वतःचा व कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी लोकांच्या मनातील गैरसमजूती व भिती दुर करण्याच्या अनेकविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले की, आपल्या देशात आजपर्यंत जेवढे काही लसीकरण झाले त्यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. लसीकरण करून घेणे म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आहे. आणि यामुळे आपण कोरोनाशी लढा देऊन त्यावर मात करून शकता. त्यानंतर त्यांनी असेही प्रतिपादन केले की, आता पावसाळयाला सुरुवात होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पावसाळयामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशावेळेस जर त्या गावात कोरोनाचाशिरकाव झाल्यास आरोग्य यंत्रणा पाल्यू शकणार नाही. पर्यायाने जिवीत हानी होण्याची शक्यतानाकारता येत नाही. त्यामुळे आताच नागरीकांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सरपंच व अन्य नागरीकांकडून लसीकरणा बाबत असलेल्या समस्या जाणूनघेतल्या.

जनजागृती सभेला सोमनाथ माळो, तहसिलदार कुरखेडा, अनिता तेलंग, गटविकास अधिकारी, पंचायत समिती फरखेडा, विनोद मशाखेत्री, अतिरिक्त जिल्हा आरोग्यअधिकारी, डॉ. दामले, तालुका आरोग्य अधिकारी कुरखेडा, डॉ. सतीश गोगुलवार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी यांनी कोरोना महामारीबाबत चित्रीकरण दाखवून लोकांच्या गैरसमजुती दुर केल्या.

सदर सभेच संचालन व आभार डी. पी. भोगे, विस्तार अधिकारी (पंचायत ) यांनी केले.

हे देखील वाचा :

ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत

तेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 47 कोरोनामुक्त, तर 11 नवीन कोरोना बाधित

 

Comments are closed.