Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बर्ड फ्लू च्या भीतीने चिकन खाणे बंद केलेल्या लोकांसाठी जालन्यात चिकन मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती

नागरिकांमधली बर्ड फ्लू ची भीती निघून जावी म्हणून आयोजकांनी जवळपास 2 क्विंटल चिकन आणून त्यापासून चिकन बिर्याणी,व चिकन फ्राइड च्या विविध रेसिपी करून चिकन प्रेमींना खाऊ घातल्या.  

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. 24 जानेवारी: राज्यात सुरू असलेल्या बर्ड फ्लू च्या घटनांमुळे पोल्ट्री मालक, शेतकऱ्यांचे अतोनात आर्थीक नुकसान होत असून लोकांमध्ये बर्ड फ्लू संदर्भात भीती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मनातील हा संशय दूर करण्याच्या उद्देशाने जालना जिल्हा कुक्कुटपालन व्यावसायिक संघटनेच्या वतीने 23 जानेवारी ला जालना शहरात “चिकन मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या “चिकन मेळाव्याचे” उदघाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या चिकन मेळाव्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,उपविभागीय अधिकारी डॉ सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कुरेवाड यांच्या सह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. नागरिकांमधली बर्ड फ्लू ची भीती निघून जावी म्हणून आयोजकांनी जवळपास 2 क्विंटल चिकन आणून त्यापासून चिकन बिर्याणी,व चिकन फ्राइड च्या विविध रेसिपी करून चिकन प्रेमींना खाऊ घातल्या.यावेळी अधिकारी मान्यवरांनी देखील लोकांनी भीती बाळगू नये यासाठी चिकन च्या रेसिपीचा स्वाद घेतला व लोकांनी भीती बाळगू नये असे आवाहन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की आपण नियमित जसे खातो त्याप्रमाणेच मास खाण्यात कुठलाही धोका नाही,परंतु खाताना योग्य ती काळजी घ्यावी.व्यापाऱ्यांनी सुद्धा योग्य ती खबरदारी घेत उपाय योजना कराव्या जेणे करून काही धोका होणार नाही.आज येथे आलेल्या खवय्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व न घाबरता चिकन मेळाव्यात चिकन खाण्याचे आवाहन केले.

सर्व मान्यवरांनी चिकन मेळाव्यात उपस्थित खवैयांना शुभेच्छा दिल्यानंतर चिकन प्रेमींनी चिकन बिर्याणी, उकडलेली अंडी व विविध फ्राइड चिकन रेसिपींचा आस्वाद घेतला. यावेळी बोलताना कुक्कुटपालन व्यवसायातील पशुवैद्यकीय डॉक्टर फिरोज खान म्हणाले की जिथे पक्षी सापडले ते कुठल्या बॉयलर फॉर्मशन असल्यामुळे लोकांनी घाबरू नये ज्या ठिकाणी लसीकरण झालेले नाही ज्या ठिकाणी रोगप्रतिबंधक नियोजन करण्यात आलेले नाही अशा ठिकाणी पक्षी सापडले असून जालन्यातील सर्व पक्षांचा अहवाल हा निगेटिव आलेला असल्यामुळे लोकांनी घाबरून घाबरू नये असे आवाहनही त्यांनी केले लोकांच्या मनातील देखी निघावी यासाठी चिकन मेळाव्याचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.