Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपाच्या वतीने कामगार व रिक्षा चालकांना राशन किटचे वाटप

केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षपूर्ती निमित्त खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 30 मेकेंद्रातील मोदी सरकारला यशस्वीरीत्या ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून आज  दि. ३० मे रोजी शहरातील रिक्षा चालक, मजूर, हमाल वर्ग व कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंच्या राशन किटचे तसेच मास्क व सॅनिट्रायझर चे वाटप करण्यात आले.

यावेळी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकरराव यनगंधलवार, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,  न. पं. उपाध्यक्ष अनिलजी कुणघाडकर, भाजयुमो चे जिल्हा महामंत्री संजयजी बारापात्रे, महिला आघाडीच्या अध्यक्ष दुर्गाताई काटवे, आदिवासी मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, कविताताई बारसागडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, राकेश राचमलवार, राजुभाऊ शेरकी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, प्रकाशजी गेडाम, गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिक्षा चालक व कामगारांना राशन किट, सैनीटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षपूर्ती निमित्त विवेकानंदनगरात मास्क व सैनीट्रायझरचे वाटप

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण

सावली तालुक्यात 150 गरजूंना खा. अशोक नेते यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Comments are closed.