Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पारडी कुपी, दुर्गापूर, घोट व मुरगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व

सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार डॉ. देवराव होळीने केले अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  18,ऑक्टोबर :-  गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती आले असून निवडणूक झालेल्या चारही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टी ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पारडी कुपी, दुर्गापूर, घोट व मुरगाव ग्रामपंचायती वर भाजपा के सरपंच व सदस्य निवडून आल्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील घोट व दुर्गापूर, धानोरा तालुक्यातील मुरगाव आणि गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी या ठिकाणी थेट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक झाली असून या निवडणूकीचे निकाल हाथी आले आहेत. पारडी कुपी येथे भाजपा चे संजय गजाननराव निखारे, दुर्गापूर येथे सोनी गणेश मंडल, घोट येथे रूपाली प्रशांत दुधबावरे तर मोरगाव येथे मारूती गेडाम सरपंच म्हणून विजयी झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तालुक्यातील लेखा व जप्पी येथे सरपंचाची बिनविरोध निवडणूक पार पडली असून कामतळा येथे कोणीही फार्म न भरल्याने निवडणूकच नाही झाली. गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये परत एकदा भाजपा ने आपले वर्चस्व सिध्द केले असून आमदार डॉ. होळी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

20 रूग्णांवर झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मी संविधान मानणारा त्यामुळे चौकशीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी – अजित पवार

Comments are closed.