Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुप तोडीचे काम जबाबदारी ने करा

आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 18,ऑक्टोबर :-  दरवर्षी कुपतोडीद्वारे उत्पादित वनोपजापासून शासनास करोडो रूपयांचा महसुल प्राप्त होतो. त्यामुळे कुप तोडीचे काम जबाबदारीने पार पाडणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून वनाचे संरक्षण व संवर्धनाचे ईश्वरीय कार्य निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी केले. आलापल्ली वनविभाग अंतर्गत मंजूर कार्य आयोजने नुसार 2022-23 मध्ये आलापल्ली वनविभाग अंतर्गत मंजूर कार्य आयोजन प्रमाणे करण्यात येणार्या वृक्ष तोडी बाबत गडचिरोली वनवृत्तांचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वनविकास महामंडल चे एम.पी. मदने, प्रमुख अतिथी म्हणून आलापल्लीचे उपविभागीय वन अधिकारी नितेश शंकर देवगडे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी प्रदिप बुधनवार उपस्थित होते.एम.पी. मदने यांनी कार्यआयोजने अंतर्गत करण्यात येणार्या सी.डब्ल्यू.सी., एस.सी.आय.डब्ल्यू.सी व बांबू कार्यवृत्त अंतर्गत येणार्या विविध कामांची सविस्तर माहिती देउन उपचार नकाशा तयार करणे, सिमांकन करणे, मार्किंग करणे, वृक्षतोड करणे, वृक्षापासून नग घडविणे, नगावरती मोजमाप नोंदविणे या सर्व कामांचे दस्ताएवज नोंदविण्याची कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले.

आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजूर कार्य आयोजनेनुसार 2022-23 मध्ये सी.डब्ल्यू.सी. कार्यवृत्त अंतर्गत 11 कुप, एस.सी.आय. कार्यवृत्त अंतर्गत 27 कुप, आय.डब्ल्यू.सी. कार्यवृत्त अंतर्गत 11 कुप व बांबू कार्यृत्त अंतर्गत 8 कुपामध्ये वृक्षतोडीचे काम करण्यात येणार आहे. या कुपांपासून 35249 घनमिटर इमारती माल, 36835 जळाउ बिटे, 550000 लांब बांबू आणि 55000 बांबू बंडल्स उत्पादित होणार असून सदर उत्पादित वनोपजापासून 200 कोटी रूपयांपर्यंत अपेक्षित शासन महसूल निर्माण होणार आहे. या कामाद्वारे आलापल्ली वनविभाग अंतर्गत येणार्या गावातील नागरीकांना 693300 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्याकरीता 19 कुपांचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला असून जंगल कामगार सहकारी संस्थांनी जिल्हा संघाद्वारे 17 कुपांची मागणी केली असून सदर कुपांच्या तोडीमधून 7965 घनमिटर ईमारती माल, 14017 जळाउ बिटांचे उत्पादन अपेक्षित असून याद्वारे जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभासदांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यशाळेचे प्रास्ताविक उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप बुधनवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी शोभा झोडे, अनिल झाडे, अभिनंदन राठोड, जिवन पुसाटे, प्रदिप कैदलदार, दामोदर चिव्हाणे, सचिन जांभोळे, सायत्रा सोनेले, श्रिनिवास गंजीवार व सुरज बावणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत आलापल्ली वनविभागातील आलापल्ली, अहेरी, पेरमिली, पेडीगुंडम, मार्कंडा, चामोर्शी, घोट परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे 86 अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पारडी कुपी, दुर्गापूर, घोट व मुरगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व

20 रूग्णांवर झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Comments are closed.