भाजपने आज राज्यभर विजबिलावर आंदोलन केले,मात्र ते आंदोलन फसले असून त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही- ऊर्जामंत्री नितिन राऊत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: भाजपने आज राज्यभर विजबिलावर आंदोलन केले, मात्र ते आंदोलन फसले असून त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी सांगितले. ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. विशेष म्हणजे 79 टक्के लोकांनी वीजबिल भरले असून,जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला असल्याने स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपची केविलवाणी धडपड सुरू आहे
वीज हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे,त्यामुळं जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून भाजपचा खटाटोप सुरू आहे, कोरोना काळात महावितरण अडचणीत आले असुनही
आम्ही नागरिकांना 24 तास वीज दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
वीज कनेक्शन कापले नाही,मात्र, थकबाकी 75 हजार कोटींवर गेलीय, भाजपने थकबाकी वसूल केली नाही म्हणून म्हणून आज थकबाकी वाढली. केंद्राने राज्याची थकबाकी दिली नाही, ती दिली असती तर वीज ग्राहकांनी सवलत देता आली असती. केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे महावितरण अडचणीत आली, ग्राहकांना विनंती आहे की आम्ही चुकलो असेल त्यांनी ती चूक लक्षात आणून द्यावी, मात्र, वीजबिल बरोबर असेल तर ते त्यांनी भरावे, ही विनंती
Comments are closed.