Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन अधिकाऱ्यांच्या जाचक त्रासामुळे तथा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनामधील कमी दरामुळे कंत्राटदारांचे निविदेवर बहिष्कार.

तातडीने लक्ष घालण्याचे खासदार व आमदारांना साकडे....

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 15 मे – अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कंत्राटदारांना आधीच अडचणींना तोंड द्यावे लागत असतांना वन विभागातील अधिकारी एनओसी करीता ना हरकत प्रमाणपत्रा करिता स्वार्थापोटी कंत्राटदारांना नाहक त्रास देऊन भरमसाठ मागणी करीत असल्याची बाब उघडकीस आली असून जनतेच्या सुलभ आवागमनामधिल जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून शासनाच्या कामात व्यतय आणत असल्याने तथा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे दर लागतीनुसार कमी असल्याने या दोन्ही बाबींमध्ये खासदार व आमदारांनी तातडीने लक्ष घालावे याकरिता सर्व कंत्राटदारांनी मागणी वजा साकडे घातले.

सदर स्थिती तातडीने निवडण्याकरिता उद्याच्या निविदेवर बहिष्कार सुद्धा टाकत असल्याचे घोषित केले. याप्रसंगी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदारअशोक जी नेते व आमदार डॉक्टर  देवरावजी होळी, आमदार  कृष्णाजी गजबे यांनी कंत्राटदार संघटनेला आज दिनांक 15 मे 2023 रोजी गडचिरोली येथील विश्रामभवनात बैठकी दरम्यान आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.