Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व रद्द, शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची कारवाई; कुरुड़ ग्रामपंचायपत येथील प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी : तालुक्यातील कुरूड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका सदस्याचे सदसत्व रद्दची कारवाई जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी केली आहे.

शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. सदर कावाईमुळे कुरूड ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरपंच विनोद मडावी व ग्रामपंचायत सदस्या वर्षा मुरकुटे अशी सदसत्व रद्द करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चामोर्शी तालुक्यातील रामपुर येथील कैलास धोडरे यांनी या संदर्भात १७ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून तपासणी केली असता सदर जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कारवाई करत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याचे सदसत्व रद्द केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोली-चामोर्शी मार्ग दुसऱ्याही दिवशी बंदच!, पोटेगांव – कुनघाडा रै. मार्गे वाहनांची वाढली आवागमन

केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

 

Comments are closed.