Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृध्दाची फसवणूक करत हात चलाखी ने एटीएम मधून पैसे लंपास

पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मीरा-भाईंदर 19,ऑक्टोबर :- मीरा-भाईंदर, हात चलाखी ने एटीएम कार्ड बदलून वृध्दाची आर्थिक फसवणूक करणार्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आफताब उर्फ रिकी इकलाख खान रा. बंगला नं. 48 शिवनगर काॅलनी, चांदमारी लमही, ठाणा शिवपूर वाराणासी, उत्तरप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हरिदास राजाराम भानते हे काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील एटीएम मशीन मधुन पैसे काढत असतांना एका अज्ञात इसमाने त्यांचा एटीएम पिनकोड पाहुन त्यांचे एटीएम कार्ड हात चलाखीने बदलुन 4 वेळा 10 हजार रूपये असे एकुण 40 हजार रूपये काढून फसवणूकीची तक्रार दाखल केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला. तपासाअंती मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आरोपी वाराणासी उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाराणसी एसटीएफच्या मदतीने आरोपी आफताब उर्फ रिकी इकलाख खान याला अटक करण्यात आली. यावेेेेेळी आरोपी कडून सदर गुन्ह्यात चोरी गेलेले एसबीआय बॅंकचे एटीएम कार्ड तसे इतर बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड असे एकुण 46 एटीएम कार्ड, रोख रक्कम व एक मोबाईल असा एकुण 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, नितीन बेंद्रे, अनिल नागरे, जयकुमार राठोड, सुशिल पवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.