Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विभागीय वनहक्क समितीपुढे बाजू मांडण्यासाठी खमनचेरू नागरिकांनी नागपूरला रवाना!!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांनी करून दिली बसची व्यवस्था!!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 1 सप्टेंबर : अनेक वर्षांपासून वनहक्क मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी विभागीय समितीकडे अपिल केले होते.त्यानुसार अनेक नागरिक नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रवाना झाले. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडलावार यांनी त्या नागरिकांना जाण्यायेण्यासाठी बसची व्यवस्था करून दिली.

अहेरी तालुक्यातील खमनचेरू,चिंतलपेठ,बोरी परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी विभागीय वनहक्क समितीकडे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अपिल केले होते. त्यावर विभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी १ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.त्यामुळे हे नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सकाळी ११ वाजेपर्यंत सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजय कंकडलावार यांनी सर्वांसाठी स्पेशल बसची व्यवस्था करून दिली.त्यामुळे त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे आभार मानत आपल्याला आता योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीत कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम,सरपंच शयलू मडावी,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,विनोद रामटेके,रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम,भिवा येंका झाडे,प्रभाकर दादाजी भडके,दिनकर राजू उरोड,शंकर बक्का गोरले,सिताराम तुकाराम चूनारकर,आनंदराव यादव कुकुडकर,नितीन रावजी गोंगले,देवाजी जयराम मुंजमकर,ताराचंद दामाजी चूनरकर,मारोती जयराम मुंजमकार,संजय गंगाराम दुर्गे,पत्रू लक्ष्मण करमे,कमला शंकर करमे,कुसुम भगवान पिपरे,जयशिल विलास झाडे,दामाजी कारू चुनारकर,प्रकाश हनुमंत दुर्गे, कौशल्यबाई गजानन भडके,कलूबाई मनोहर चूनारकर,वनिता दुर्गे,लक्ष्मीबाई सोमजी वेडे,मेंगु मालू तेलसे मोतीराम देवगडे, रमेश देवगडे,गमतीदास वनकर,अशोक भसारकर,मारोती तेलसे,राजहंस भसारकर,माणिक पत्रू करमे सतिश भगवन पिपरे,बुद्धदास भसारकर, आत्माराम गांधारे,नामदेव डोंगरे,एजापती गोलजीवार,मारोती डोंगरे,लिंगाजी रामटेके,हबटू,डोंगरे,देवेंद्र दुर्गे,राकेश डोंगरे,विलास चंद्रकरसह इतर खमनचेरू गावातील नागरिक उपस्थित आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.