दादा.. दारूमुळे संसाराची राखरांगोळी झाली ; महिलांनी मांडली व्यथा
जिल्हाभरात मुक्तिपथ गाव संघटनेतर्फे 'राखी विथ खाकी'
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 31ऑगस्ट : शहरातील व गावखेड्यातील अवैध दारूविक्री बंद करा अशी ओवाळणी पोलीस बांधवाला राखी बांधत विविध गाव व शहर संघटनेच्या महिलांनी मागीतली. मुक्तिपथ गाव संघटना व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यात ‘राखी विथ खाकी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिस दादांना राखी बांधून महिलांनी आपली व्यथा मांडली.
Comments are closed.