Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यात वाघाच्या हल्यात एक इसम ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, 5 मार्च: पोंभुर्णा येथील चेक आष्टा मध्य चांदा वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 96 राखीव वन क्षेत्रात 4 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 55 वर्षीय पुरुषोत्तम मडावी हे इतर तिघांसह झाडू गवत गोळा करण्यासाठी गेले होते . त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मडावी यांचेवर हल्ला चढवीत ठार केले, मडावी यांच्या सहकाऱ्यांनी गावात येत घडलेला प्रकार सांगितला असता याची माहिती वनविभागाला दिली . वनविभागाने आज सकाळी मडावी यांचा मृतदेह ताब्यात घेतला . वन्यजीवांचा वावर असलेल्या राखीव क्षेत्रात गावकऱ्यांनी जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे .

Comments are closed.