Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयातील अत्याचारग्रस्त वृध्द वक्तींची सेवा व काळजी घेण्याकामी राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डर लाईन टोल फ्री क्रमांक 14567 वर संपर्क

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.13 सप्टेंबर : सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत देशातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 सुरु करण्यात आले आहे.

यासाठी राष्ट्रीय समाजिक संरक्षण संस्था (NISD) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फांऊडेशन, पुणे यांच्या संयुक्त, विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी (वयोमर्यादा 60 वर्ष) राष्ट्रीय हेल्पलाईन जनेसवा फांऊडेशन , पुणे तर्फे चालविली जात आहे. सदर राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश वयोवृध्द नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी, शासन निर्णय क्रमांक जेष्ठता 2016 /प्र.क्र.71 सामास दिनांक 09 जूलै, 2018 मध्ये नमुद बाबीकरीता जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तेव्हा गडचिरोली जिल्हयातील जेष्ठ/वयोवृध्द नागरिकांना या कळविण्यात येते की, आपल्या समस्या/तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 यावर संपर्क करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

 

Comments are closed.