Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खरीप हंगाम 2020-21 ची पीक पैसेवारी जाहीर

जिल्हयाची सरासरी पैसेवारी 0.63, तर 50 पेक्षा कमी टक्केवारी 156 गावांत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 30 डिसेंबर: खरीप पिकाची पैसेवारी संकलीत करुन सन 2020-21 या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हयाची अंतिम सरासरी पैसेवारी ही 0.63 आहे. जिल्हयात एकूण 1688 गावे असून, खरीप पिकाची गावे 1544 आहेत, व एकूण पिका खालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 10 आहे. त्यापैकी खरीप गावामध्ये पीक नसलेली गावे 61 आहेत. सदर खरीप पीक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आतील गावे 156 असून, 50 पैशाचे वर पैशेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1337 आहेत. अशा प्रकारे एकूण 1493 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुका निहाय अंतिम पैसेवारी : गडचिरोली-0.59, धानोरा-0.67, चामोर्शी-0.59, मुलेचरा-0.74, देसाईगंज-0.57, आरमोरी-0.67, कुरखेडा-0.68, कोरची-0.46, अहेरी-0.70, एटापल्ली-0.65, भामरागड-0.57, सिरोंचा-0.71, गडचिरोली जिल्हयाची एकुण सरासरी खरीप हंगाम 2020-21 या वर्षाची अंतिम पैसेवारी 0.63 आहे. 50 पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 156 गावांमध्ये आरमोरी-22, कोरची -128 अशी गावे आहेत. यातील कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापुर्वीच जाहीर करण्यात आला आहे. सदर पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे.

Comments are closed.