Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आविसचे सुजय मंडल व अमल विश्वास यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केले स्वागत  
  • लगाम परिसरात आविसचा त्याग केल्याने राजकीय चर्चेला मोठे उधाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ३० डिसेंबर:- आविसचे व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुजय सुधना मंडल आणि आविसचे सक्रिय कार्यकर्ते अमल अतुल विश्वास यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा दुप्पटा घालून यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन्ही कार्यकर्ते लगाम नजीकच्या कांचनपूर येथील असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन ऐन ग्राम पंचायत निडणुकीच्या हंगामात आविसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने लगाम परिसरात राजकीय चर्चेला मोठे उधाण आले आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित मुजुमदार उपस्थित होते.

Comments are closed.