डॉ.शितल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा खुलासा
चंद्रपूर दि ३० डिसेंबर :- महारोगी सेवा समिती वरोरा आणि आनंदवन येथील सीईओ श्रीमती डा.शितल आमटे – करजगी यांच्या दि.३० डिसेंबर २०२० रोजीमृत्यु प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा जि . चंद्रपुर या ठिकाणी फौ.प्र.सं. कलम 174 अंतर्गत 101/2020 या क्रमांकाने एमओ उपजिल्हा रूग्नालय वरोरा यांचे तर्फे विशाल खापने गार्ड , उपजिल्हा रूग्नालय वरोरा यांचे फिर्यादी वरून आकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे .या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री . अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे .
पोलीस चौकशीमध्ये डॉ. शितल आमटे – करजगी हया मागील काही वर्षापासुन त्या नागपुर येथे मानोसोपचार तज्ञाकडे मागील सहा महिन्यांपासुन औषोधोपचार घेत होत्या . जुन २०२० मध्ये श्रीमती शितल आमटे – करजगी यांनी मानसिक ताण-तणावामुळे झोपेच्या गोळ्या घेवुन आत्महत्तेचा प्रयत्न केला होता . त्यावेळी त्यांनी नागपुरच्या वोकार्ड हॉस्पीटल मध्ये उपचार घेतला होता .
दिनांक २१ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे Lethal Injection ( प्राण घातक इंजेक्शन ) च्या उपलब्धतेविषयी विचारणा केली . यामध्ये त्यांनी काही कुत्रे अल्सरच्या त्रासाने ( Incurable pain ) पिडीत आहेत व त्यांना वाचवणेमध्ये काही मुद्दा नाही असे कारण सांगितले . त्यांनी त्यामध्ये त्यांनी तीन प्रकारचे इंजेक्शन मागविले . आनंदवनस्थीत रूग्नालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामन्यतः वापरले जात नाही . यामध्ये त्यांनी Neocuron , Kesol , Medzol असे तीन प्रकारचे इंजेक्शन प्रत्येकी 5 असे मागविले होते .घटनास्थळावरून वरील इंजेक्शन व Neocuron Injecton चे Ampoule फुटलेल्या स्थीतीत व वापरलेली Syringe मिळुन आलेली आहे . घटनास्थळावरून कोणतेही सुसाईड नोट मिळुन आलेली नाही . पीएम रिपोर्टमध्ये मरणाचे कारण chocking , however viscera and histopathological samples preserved असे कारण देण्यात आलेले आहेत . त्यांच्या उजव्या हातावर Interavenous Injecton चे मार्क दिसुन मिळुन आले आहे . तपासामध्ये घातपात झाल्यासंबंधीचा प्रथम दर्शनी पुरावा दिसुन आलेला नाही . सदर आकस्मीक मृत्यु चौकशी प्रकरणात अद्याप पर्यंत २६ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आलेले आहेत .
सादर प्रकरणातील घटनास्थळावरून जप्त मुद्देमाल , व्हिसेरा हा रासायनिक परीक्षणाकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा , चंद्रपुर व नागपुर या ठिकाणी पाठविण्यात आलेला आहे . घटनास्थळावरील जप्त ३ मोबाईल , एक लॅपटॉप , एक टॅबलेट हे परिक्षणाकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा , मुंबई या ठिकाणी पाठविण्यात आलेले आहे . वरील दोन्हीही प्रयोग शाळेचे अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे . अहवाल प्राप्त होताच त्याला अनुसरून योग्य तपास करण्यात येईल . सद्या सदर प्रकरण पोलीस चौकशीवर आहे.
Comments are closed.