Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रिसोर्स बँकेतील शेतक-यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे साधणार संवाद

०७.१२.२०२० रोजी, दुपारी ३.०० वाजता कृषि विभागाच्या Agricultural department, GoM या युट्युब चॅनलवर साधणार संवाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 06 डिसेंबर : कृषि विस्तार कार्यामध्ये शेतक-यांनी नेहमी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शास्त्रज्ञांशी संवाद साधत असतात परंतु ज्या शेतक-यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा शेतक-यांना जर विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेतले तर कृषि विस्ताराचे कार्य अधिक प्रभावी होऊ शकेल. या उद्देशाने कृषिमंत्री मा.ना.दादाजी भुसे यांच्या संकल्पनेवरून राज्यात शेतक-यांची रिसोर्स बँक स्थापन केलेली आहे. राज्यातील या रिसोर्स बँकतील सर्व शेतक-यांशी कृषिमंत्री मा.ना.दादाजी भुसे संवाद साधणार आहेत. तरी दिनांक ०७.१२.२०२० रोजी, दुपारी ३.०० वाजता कृषि विभागाच्या Agricultural department, GoM या युट्युब चॅनलवर क्लिक करुन जास्तीत जास्त शेतक-यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यातील शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ व्हाबी यासाठी कृषि विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सदयस्थितीत काही शेतकरी अभिनव उपक्रम, तंत्रज्ञान, सुधारित शेती पध्दत वापरून उत्पादन व उत्पन्न बाढ करत आहेत अशा शेतक-यांचा आदर्श इतर शेतक-यांपुढे ठेवणे, कृषि विभागाने या अभिनव उपक्रम, तंत्रज्ञान, शेती पध्दतीचा उपयोग इतर शेतक-यांना होण्याच्या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे ब अशा अभिनव उपक्रमशील शेतक-यांबरोबरच विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने राज्यातील शेतक-यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणा-या एकूण ३६०६ शेतकरी बंधू भगिनींची रिसोर्स बँक यादीचे अनावरण मंत्री मा.ना.दादाजी भुसे यांच्या हस्ते दिनांक ५ जूलै २०२० रोजी करण्यात आले आहे. याबरोबरच विविध कृषि पुरस्कार विजेते व पिक स्पर्धा विजेत्या शेतक-यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सदयस्थितीत एकूण ५००९ शेतक-यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील सर्व जिल्हयातील रिसोर्स बँकेतील शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचे जिल्हानिहाय व्हाट्स अँप ग्रुप तयार करण्यात आलेले असून त्याव्दारे शेतक-यांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


तरी दिनांक ०७.१२.२०२० रोजी, दुपारी ३.०० वाजता कृषि विभागाच्या Agricultural department, GoM या युट्युब चॅनलवर क्लिक करुन जास्तीत जास्त शेतक-यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments are closed.