Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जन आरोग्य योजनेतून विविध प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप.

“आयुष्यमान भारत दिनाचे यशस्वी आयोजन.”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 24, सप्टेंबर :- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासुन व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 पासुन गडचिरोली जिल्हयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली कार्यान्वित आहे. आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्दिष्टेपूती झाल्यामुळे 23 सप्टेंबर हा दिवस “आयुष्यमान भारत दिवस” म्हणून साजरा करण्यासंदर्भात प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांचे कडून सूचना प्राप्त झालेले होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारला सकाळी 11.00 वाजता सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.

सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोलंके, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.बेले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल मडावी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंर्पक) डॉ.बागराज धुर्वे आदी अधिकारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील व सदर योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रर्दशन अजय ठाकरे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रमामध्ये आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे 25 गोल्डन कार्ड, 20 आभा कार्ड व 10 अपंग प्रमाणपत्र वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बालकांचे हक्क व संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा – कुमार आशीर्वाद

विक्रीकराची अभययोजना अंतिम टप्यात : उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारी बंधूनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Comments are closed.