Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करा .म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे प्रतिपादन..

म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे प्रतिपादन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ०६ डिसेंबर : कुठल्याही संघटनेमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाच्या माध्यमातून पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी केले. ते रविवार 5 डिसेंबरला पत्रकार भवनात आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आढावा बैठकीत बोलत होते.


पुढे बोलताना प्रा. पानसे म्हणाले, कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून गडचिरोली जिल्हयात आढावा बैठक घेण्यात आली नव्हती. मात्र, अप्रत्यक्षरित्या संघटनेच्या कार्याविषयी वरिष्ठांपासून ते तालुका पातळीवरच्या सदस्यांशी संवाद सातत्याने होते. आता जिल्ह्यात कोरोना सक्रमण सौम्य झाल्याने तालुक्यातालुक्यांत बैठका आयोजित करून समाजात आपली प्रतीमा उंचावण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून सामाजिक उपक्रम घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संघटनेचा फायदा, संघटना वाढविण्याची गरज यावर विस्तृत मार्गदर्शन करीत आपल्या मागण्या, न्याय हक्कासाठी पत्रकारांना एकजूट होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व भाषीक पत्रकारांना एकाच छत्रछायेत येण्याच्या दृष्टीने व संघटनेत समावेश करण्याच्या हेतुने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नव्याने नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ असे करण्यात आले आहे. त्याचा फायदा अतिदुर्गम शेवटच्या टोकावर काम करणा-या पत्रकारांना होणार आहे. त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिलेल्या जबाबदारीचे निष्ठेने काम करण्याची अावश्यकता असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सांगितले.
कोराेना काळातील मागोवा सांगताना प्रा. पानसे म्हणाले, कोरोना संक्रमणातील संकटे व संघटनेचा फायदा याबद्दल उदाहरणासहीत विस्तृत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोराेना संक्रमणामुळे महाराष्ट्रातील 257 पत्रकाराना आपला जीव गमवावा लागला. त्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे 200 हुन अधिक सदस्यांचा समावेश आहे. कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गरजू गावांत 37 ट्रक् इतका जीवनावश्य वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. हे सर्व संघटनेच्या माध्यमातूनच साध्य करता आले. महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागांत व तळागळात काम करणा-या पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात पत्रकारांचा सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे. असे असतानाही पत्रकार कोरोना योद्धा का होऊ शकला नाही, ही चिंतनाची बाब असल्याचे ते म्हणाले.

आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रुपराज वाकोडे, ओम चुनारकर, नसीर हाशमी, श्रीधर दुग्गीरालापाटी, सोपानदेव म्हशाखेत्री,  अभय इंदूरकर, घनशाम म्हशाखेत्री, आनंद बिश्वास, निलेश टोंगे, अनिल तिडके, किशोर खेवले, पंकज चहांदे, शेखर फुलमाडी, विजय भैसारे, मुक्तेश्वर म्हशाखेत्री, मिलिंद खोंड, पांडूरंग कांबळे, हेमंत उपाध्ये, राजेंद्र सहारे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

Comments are closed.