Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विविध साहित्यांचे वाटप,

गडचिरोली वनविभागाचा अभिनव उपक्रम..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि, २४ मार्च :  गडचिरोली वनवृत्तातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीतून गावचा विकास होण्यासाठी गडचिरोली वनविभागामार्फत विविध साहित्यांचे वाटप आज २४ मार्च रोजी करण्यात आले..

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामिणांच्या सहभागातून वनसंवर्धन करणे, गावातील संसाधनांचा शाश्वत विकास साधून पर्यायी रोजगार संधी वाढवणे व लोकांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजनेअंतर्गत विविध लोकोपयोगी साहित्याचे वनव्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात आले. यामधे इलेक्ट्रिक रिक्षा, मळणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, रोटावेटर, पाणी गरम करण्याचे बंब, कुक्कुटपालनचे यांसारख्या साहित्यांचे वाटप प्रमुख पाहुण्यांचे हस्ते समित्यांचे अध्यक्ष/सचिव यांना देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. संदीप कऱ्हाळे, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, गडचिरोलीचे तहसिलदार गणवीर, मृद परीक्षण प्रयोगशाळा, गडचिरोलीचे श्र. बादाडे, मिलिंद उमरे, मानद वन्यजीव रक्षक  उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कृपाळा, रानभूमी, चांदाळा, चातगाव, सावरगाव अशा एकूण ३८ वनव्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व सचिव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वनालगत राहणारे ग्रामस्थ जळाऊ लाकूड, बांबू, चराई, मोहफुल, तेंदू, रानभाज्या अश्या अनेक गोष्टींसाठी वनांवर अवलंबून असतात, मात्र ह्या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग घेतला पाहिजे तसेच समित्यांनी सदर साहित्याचा उपयोग करून गावाचा विकास साधावा. यामुळे त्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी होऊन मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल. तसेच दुधाळ गायी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशाप्रकारचे शेतीपूरक जोडधंदे करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर मानकर यांनी केले.

सदर साहित्य लवकरच समित्यांना वर्ग करण्यात येईल त्यांचा त्यांनी आपल्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन गडचिरोलीचे उपवसंरक्षक मिलिश शर्मा यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार गडचिरोली वपरिक्षेत्राचे प्रभारी अधिकारी  धिरज ढेंबरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडचिरोली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.