Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सुरत , 23 मार्च :-2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावर भाष्य करताना म्हटले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी आहे का?. या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुरतच्या न्यायालयाने सकाळी 11 वाजता निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आहे.

2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात’, असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारांनं पोलिसांत तक्रार केली होती.   राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे. राहुल गांधी कोर्टात म्हणाले, कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही असे ते मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.