Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व ग्रंथोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 12 एप्रिल – गोंडवाना विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची केलेली पुनर्रचना” या विषयावर व्याख्यानाचे तसेच महामानव डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारांवर आधारीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यान तसेच ग्रंथोत्सवाचे आयोजन सोमवार, दि. 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता विद्यापीठ सभागृह (जुनी इमारत) येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ. आंबेडकर विचारधारा माजी विभाग प्रमुख डॉ. शैलेन्द्र लेन्डे असणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे भुषविणार आहेत तर कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चित्र व निबंध 12 एप्रिल 2024 पर्यंत मागविण्यात आले होते. सदर चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सदर कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनीनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.