Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मका खरेदी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 23 मे – पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मका खरेदी नोंदणीकरिता 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचे प्रत्यक्ष छायाचित्र अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

ही आहेत खरेदी केंद्रे: सावली तालुक्यातील सेवा सहकारी संस्था पाथरी, कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, व कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा ही खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.