Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस स्किलींग इन्स्टीट्युटच्या माध्यमातून सुरक्षागार्ड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

एकूण 38 प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 20 मे – गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडाण सर्वकष सक्षमीकरण अंतर्गत युवकांना रोजगार, कला, साहित्य व खेळ यामध्ये संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस स्किलींग इन्स्टीट्यूट एसपी ऑफीस गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवकांना आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक  नीलोत्पल  यांचे मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा समारोपय कार्यक्रम आज दिनांक २०/०५/२०२३ रोजी पोलीस मुख्यालयाच्या जेटीएससी हॉल, गडचिरोली येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाने आयोजीत केलेल्या सुरक्षा रक्षक प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातीन एकूण ५० पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यापैकी ३८ प्रशिक्षणार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दिनांक २०/०३/२०२३ ते २०/०५/२०२३ पर्यंत एकूण ६० दिवसाच्या या निवासी प्रशिक्षणात पोलीस दलात कार्यरत असलेल्या कवायत प्रशिक्षकांमार्फतीने सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मैदानी चाचणी प्रशिक्षण व आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता सा. यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील. तसेच सन २०२३ या वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक-युवतीसाठी १०,००० नवीन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून द्यावे व त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ ध्याचा व आपल्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच सुरक्षा रक्षक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना माची आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालारा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकन्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना व्युटीपार्लर २७४ भव्यपालन ८७, कुक्कुटपालन ५६५, बदक पालन १००, वराहपालन १०, शेळीपालन १४२ शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण २०६२ टू व्हिलर दुरुस्ती १३४, फास्ट फुड १२७, पापड लोणचे ५१, फोर व्हिलर वाहन प्रशिक्षण ५९२, एमएससीआयटी २३१, कराटे प्रशिक्षण ४८ व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण ३५, सुरक्षा रक्षक ३८ असे एकूण ५१९४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर समारोपीय कार्यक्रम अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सहायक आयुक्त जि. की. वि. विभाग, गडचिरोली योगेश शेंडे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभाग तसेच पोस्टे / उपपोस्टे / पोमकेचे सर्व अधिकारी / अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.